जिल्ह्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रशासनाने निवडणुकीसंदर्भात सर्व तयारी पूर्ण केली आहे, मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार यांनी दिली.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदारांची यादी जाहीर करण्यात आली असून ८८७५ मतदारांचा अंतिम यादीत समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीसाठी ५११ पोल स्थापन करण्यात आले असून ग्राम पंचायत आणि स्थानिक स्वराज राज्य संस्थांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार यांनी दिली.
बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चिकोडी येथे मतमोजणी केंद्र स्थलांतर करण्यात आल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतमोजणी दिवशी बेळगावमध्ये अधिवेशन भरविण्यात येणार असून या कारणास्तव चिकोडीमध्ये मतमोजणी केंद्र स्थापन करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आदेश दिल्यास चिकोडीमध्ये मतमोजणी केंद्राची स्थापना करण्यात येईल. अन्यथा बेळगावमध्ये मतमोजणीची संपूर्ण व्यवस्था असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनाची संपूर्ण तयारी झाली आहे. यासोबतच विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली असून जिल्हा प्रशासन या निवडणुकीसाठी सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आर. वेंकटेश यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली आहे.


Recent Comments