Belagavi

संभाजीनगरमध्ये तोरणागड प्रतिकृती उद्घाटन

Share

दीपावली निमित्त संभाजीनगर -गाडेमार्ग, वडगाव येथील बालगोपाळांनी तयार केलेल्या तोरणा गडाच्या प्रतिकृतीचा उद्घाटन समारंभ काल रविवारी पार पडला.

दिपावली जवळ आली कि संभाजीनगर गाडेमार्ग वडगाव येथील लहान मुलांसह युवक छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची साक्ष म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या गडांची प्रतिकृती तयार करत असतात. एक महिना आधीच मातीसह सर्व साहित्याची जमवाजमव सुरु असते. कल्पकतेने आणि जीव ओतून गड किल्ला हुबेहूब बनवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले जातात. त्याच पद्धतीने यंदा बालगोपाळांनी संभाजीनगर गाडेमार्ग वडगाव येथे नावाजलेला तोरणा गडाची (प्रचंडगड) प्रतिकृती तयार केली आहे.

तोरणा गडाचा या प्रतिकृतीचे उद्घाटन समारंभ काल रविवारी सायंकाळी पार पडला प्रमुख पाहुणे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते रंजन मरवे यांच्या हस्ते फित कापून किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील बाल गोपाळ व युवकांसह शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. तोरणा गडाची प्रतिकृती तयार करण्यासाठी साई शहापूरकर, सक्षम कंग्राळकर, समर्थ शहापुरकर,स्वयंम कंग्राळकर, संतोश कंग्राळकर, स्वयंभू देसुरकर, आकाश गडकरी आदींनी विषेश परिश्रम घेतले. सदर किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

Tags: