Belagavi

विणकर आत्महत्या : आ. जारकीहोळी यांनी केले कुटुंबियांचे सांत्वन

Share

 कर्जाच्या बोजाला कंटाळून आत्महत्या केलेल्या बेळगाव दक्षिण मतदारसंघातील वडगाव येथील विणकरांच्या कुटुंबीयांची केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनी रविवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले

होय, नुकतेच कर्जाच्या बोज्याला कंटाळून वडगाव भागातील पांडू उपरी, गणपती बुचडी या विणकरांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले. या पार्श्वभूमीवर केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आयुष्य खडतर असते, पण न डगमगता धीराने येईल त्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे असे सांगून, मृतांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे भरपाई आणि सुविधा मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी बोलताना मृत विणकरांच्या पत्नीनी स्थानिक आमदार, नगरसेवक आमच्याकडे लक्ष देत नाहीत असे सांगून आजवर कसलीच मदत मिळाली नसल्याचे डोळ्यात अश्रू आणत सांगितले. कोरोना आणि पावसामुळे आमची स्थिती बिकट झाली. कर्ज फेडणे अशक्य झाले. त्यामुळे कुटुंबाच्या कर्त्यांनी आत्महत्या केली. कोरोना संकटात तर ३ महिने अन्नपाण्याविना उपाशी राहण्याची वेळ आली तरीही स्थानिक आमदार किंवा अन्य कोणी मदत केली नाही अशी व्यथा त्यांनी मांडली.

 

Tags: