जागतिक लिंगायत महासभेची वार्षिक सर्व साधारण सभा आज बेळगावात पार पडली.

होय, जागतिक लिंगायत महासभेचे मुख्य कार्यालय बेंगळूरहून बेळगावात स्थलांतरित करण्यात आले आहे. कालच त्याचे उदघाटन झाले. त्यानंतर आज, रविवारी जागतिक लिंगायत महासभेची वार्षिक सर्व साधारण सभा बेळगावात पार पडली. या सभेला अनेक लिंगायत स्वामीजी तसेच निवृत्त जिल्हाधिकारी आणि महासभेचे ज्येष्ठ नेते एस. एम. जामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लिंगायत महासभेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. एस. एम. जामदार यांनी कर्मसिद्धांत व अन्य विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे सदस्य व लिंगायत समाजातील मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments