Belagavi

घरगुती कामगार संघटनेचा निषेध मोर्चा

Share

 घरगुती कामगारांना समाजात स्थान नाही. सरकारही त्यांनाकामगारम्हणून दर्जा देत नाही. याच्या निषेधार्थ घरगुती कामगार संघटनेच्या वतीने मोर्चा काढून कामगार कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मोलकरीण व घरगुती कामगारांना काम करून घेऊनही हीन वागणूक देण्यात येते. त्यांना समाजात कोणतेही स्थान नाही. कसलीही सामाजिक सुरक्षा नाही. अनेक घरांत त्यांच्यावर गंभीर आरोप केले जातात. त्यांना चांगले स्थान, कामगार दर्जा मिळावा यासाठी गेल्या १० वर्षांपासून घरगुती कामगार संघटनेच्या वतीने लढा देण्यात येत आहे. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ संघटनेतर्फे कामगार खात्याच्या कचेरीवर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

फ्लो यावेळी घरगुती कामगार संघटनेच्या पदाधिकारी वैशाली कम्मार म्हणाल्या, गेल्या १० वर्षांपासून आम्ही आमच्या मागण्यांसाठी लढा देत आहोत. त्यावर मंडळ स्थापन करतो असे सरकार सांगते. मात्र कृती करत नाही. घरगुती कामगारांना योग्य स्थान दिले जात नाही. साप्ताहिक सुटी व किमान वेतन दिले जात नाही. कामगार मंत्र्यांनी घरगुती कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही अशी व्यथा कम्मार यांनी मांडली.

यावेळी घरगुती कामगार संघटनेच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

Tags: