Nippani

अद्याप दर का जाहीर केला नाही? ‘हालसिद्धनाथ’ला राजू पोवार यांचा सवाल

Share

जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला असताना हालसिद्धनाथ कारखान्याने अद्याप दर का जाहीर केला नाही असा संतप्त सवाल शेतकरी नेते राजू पोवार यांनी कारखान्याच्या वार्षिक सभेत केला.
व्हॉईस ओव्हर : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा सुरु असताना सभेच्या अध्यक्षांच्या भाषणाच्या प्रति उपस्थित सदस्यांना वाटण्यात आल्या. भाषण वाचल्यावर पोवार यांनी आक्षेप घेत, कारखान्याने अद्याप ऊसदर का जाहीर केला नाही असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष मौन पाळून गप्प बसले.

यावेळी बोलताना शेतकरी नेते राजू पोवार यांनी, राज्यातील बहुतेक सर्व कारखान्यांनी ऊसदर जाहीर केला आहे. मग तुम्ही अजून दर का जाहीर केला नाही असा सवाल केला. तसेच सदस्यांना देण्यात येणाऱ्या साखरेचे प्रमाण १०० किलोवरून ५० किलोपर्यंत का कमी केले? दर जाहीर करण्यात हालसिद्धनाथ कारखान्याला काय अडचण आहे? असा प्रश्न सामान्य उसउत्पादकांना पडला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक कोणाच्या सांगण्यावरून केवळ रबर स्टॅम्प सारखे काम करत आहेत? अशा प्रश्नांची सरबत्ती करून गोंधळ माजविणाऱ्या कारखाना समर्थकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. रयत संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे. या अन्यायाच्या विरोधात शेतकरी उग्र आंदोलन करतील असा इशारा राजू पोवार यांनी यावेळी दिला.

यावेळी निपाणी रयत संघाचे शहराध्यक्ष उमेश भारमल, प्रवीण सुताळे, कलगौंड कोटगी, बाळासाहेब हादीकर, सुभाष नाईक, बाळकृष्ण पाटील, सुनील गाडीवड्डर, महेश पाटील, तानाजी पाटील यांच्यासह निपाणी तालुक्यातील रयत संघाचे सदस्य उपस्थित होते.

 

Tags: