Chikkodi

विधान परिषदेच्या २० पैकी १७ जागा भाजप जिंकेल : येडियुरप्पा

Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या २० पैकी १७ जागा भाजप निश्चित जिंकेल. केवळ जागा काही कारणाने गमवाव्या लागतील असे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.

रविवारी चिक्कोडी शहराबाहेरील महांतेश कवटगीमठ यांच्या फार्म हाऊसवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना येडियुरप्पा म्हणाले, पक्षाच्या निर्णयानुसार विधान परिषदेच्या २५ पैकी केवळ २० जागा भाजपतर्फे लढविण्यात येत आहेत. उमेदवार घोषित करण्यापूर्वीपासूनच आम्ही राज्यात प्रचार सुरु केला आहे. पक्षाचे केंद्रीय नेतेही प्रचारात उतरणार आहेत. आम्ही २० उमेदवार जाहीर केले तरीही काँग्रेसने अद्याप एकही उमेदवार घोषित केलेला नाही. यावरून उमेदवार निश्चितीबाबत काँग्रेसमध्ये गोंधळ सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

ग्रामीण भागाच्या विकासावर बोलताना येडियुरप्पा म्हणाले, ग्रामीण भागात शौचालय नसलेल्या घरांना ती पुरविण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील ८ कोटींहून अधिक लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत. प्रत्येक खेड्यात रस्ते, सुवर्णग्राम योजनेतून खेड्यांचा विकास करण्यात आला आहे. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महिलांना ५०% आरक्षण दिले आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आमच्या सरकारने चांगले कार्य केले आहे. बेळगाव जिल्ह्यात विधान परिषदेचे ८९४२ मतदार आहेत. महांतेश कवटगीमठ याना पहिल्या पसंतीचे मत देऊन निवडून आणावे असे मतदारांना करतो, आम्हाला प्रचारात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जेडीएसचे उमेदवार नसतील त्याठिकाणी आम्हाला पाठिंबा द्या असे आवाहन कुमारस्वामी याना करतो असे येडियुरप्पा म्हणाले,

यावेळी कुडची आ. पी. राजीव, महांतेश कवटगीमठ, चिक्कोडी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, मृणाल देशपांडे आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: