बेवारस अवस्थेत एका दाम्पत्याला सापडलेल्या नवजात शिशूचे नामकरण करून मंत्री शशिकला जोल्ले यांनी वात्सल्याचा दाखल दिला.

होय, मातेच्या ममतेपासून दुरावलेले हे गोंडस बाळ दहा दिवसांपूर्वी रस्त्याकडेला अनाथ अवस्थेत सापडले होते. नव्या जगात प्रवेश करून या निरागस बाळाला अवघे १० दिवस झालेत. रस्त्याकडेला बेवारस अवस्थेत सापडलेल्या या बाळाला एका दाम्पत्याने मायेची उब दिली आहे. निपाणी तालुक्यातील ममदापुर गावचे अमर पवार आणि त्यांची पत्नी शुभांगी यांनी या बाळाचे संगोपन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार या बाळाचे आई-वडील बनून ते त्याचा सांभाळ करत आहेत. या दाम्पत्याच्या विनंतीला मान देऊन मंत्री शशिकला जोल्ले यांनी प्रेमाने आणि वात्सल्याने या बाळाचे नाव ‘वैष्णवी’ असे ठेवले. विशेष म्हणजे अमर आणि शुभांगी पवार हे दाम्पत्य अशा अनेक अनाथ बाळांचा सांभाळ करून त्यांना जगण्याची उर्मी देत आहेत. त्यांच्या या माणुसकीला सलाम.


Recent Comments