खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे भाजप नेत्या धनश्री सरदेसाई–जांबोटकर यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील कणकुंबी येथे रहिवाशांना सुविधा मिळणे कठीण आहे. त्याही स्थितीत भाजप राज्य महिला मोर्चा कार्यकारिणी सदस्या धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. गावातील श्री माऊली मंदिरानजीक केएलई इस्पितळाच्या वतीने हे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात २५ तज्ज्ञ डॉक्टर्स अन नर्सनी शिबिरार्थींच्या आरोग्याची तपासणी करून सल्ला देऊन मार्गदर्शन केले. कणकुंबी व परिसरातील सुमारे ५०० हुन अधिक रहिवाशांनी या शिबिराचा लाभ घेतला. मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेतल्याबद्दल धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांचे शिबिरार्थींनी आभार मानले.


Recent Comments