विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना अवैधपणे केलेला मद्यसाठा जप्त करण्यात बेळगाव अबकारी पोलिसांना यश आले आहे.

बेळगावातील टिळकवाडीतील नेहरू रोडवरील सीटीसी नं. ३०५, जी-५ येथील क्लासिक श्रीनिवास अपार्टमेंटच्या तळमजल्यावर बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला ८ लाख ६९० रुपये किंमतीचा २३२ लिटर दारूचा साठा आणि एक टीव्हीएस-१२५ ऍक्सेस दुचाकी अबकारी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी आरोपी द्वारका नगर, टिळकवाडी येथील रहिवासी शाम गंदे रंगण्णा रेड्डी याला अटक करण्यात आली. बेळगावचे अबकारी उपायुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, बेळगाव दक्षिणचे अबकारी उपायुक्त जयरामेगौडा एम. डी. यांच्या मार्गदर्शनाखाली अबकारी पोलीस पथकाने मिळालेल्या पक्क्या खबरीवरून ही कारवाई केली.


Recent Comments