आ. अंजली निंबाळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर खानापूरला ट्रान्सफॉर्मर रिपेरी केंद्र मंजूर झाले आहे.

होय, खानापूर तालुक्यात वीज पुरवठ्याची समस्या कायम आहे. तशातच ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यास अनेक दिवस शेतकऱ्यांना आणि रहिवाशांना वीज पुरवठ्याअभावी तिष्ठत राहण्याची वेळ येते. हे टाळण्यासाठी खानापूर शहरात ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्र मंजूर करावे अशी मागणी ऊर्जा मंत्र्यांकडे करून आ. अंजली निंबाळकर यांनी सतत पाठपुरावा केला.
त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान पसरले आहे. खानापूर हेस्कॉमच्या सहायक कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर यांनी स्वतः आ. निंबाळकर यांची त्यांच्या ‘रायगड’ या निवासस्थानी भेट घेऊन ट्रान्सफॉर्मर रिपेरी केंद्र मंजूर झाल्याच्या आदेशाची प्रत देऊन मिठाई भरवून आनंद व्यक्त केला.


Recent Comments