Belagavi

रामतीर्थ नगरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त सहस्त्र दीपोत्सव

Share

श्री रामभक्त हनुमंताची भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा हे गुण अंगी बाणवल्यास मातृभूमीलाच स्वर्ग बनविणे शक्य आहे असे मत माजी सैनिक इरण्णा कट्टावी यांनी व्यक्त केले.

बेळगावातील रामतीर्थ नगरात रहिवाशांनी बांधलेल्या नूतन श्री अंजनेय स्वामी देवस्थानात कार्तिक पौर्णिमेनिमित्त सहस्त्र दीपोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी असंख्य भक्तांनी मंदिरात येऊन दीप प्रज्वलित करून अंजनेयाचे दर्शन घेतले. यानिमित्त सकाळी अंजनेयाला विशेष पूजा-अभिषेक करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी सैनिक इरण्णा कट्टावी म्हणाले, देवालये म्हणजे ध्यानधारणा आणि प्रार्थनेची पवित्र ठिकाणे होत. याठिकाणी आपणाला संस्कार मिळतात असे सांगून अंजनेय देवालय उभारल्याबद्दल रहिवाशांचे अभिनंदन केले. यावेळी सुनंदा हिरेमठ, निर्मला उरबिनहट्टी, श्रीदेवी पाटील, देवकी टोंने, महादेवी कमत, सुजाता जुटण्णावर, सरोजिनी कट्टावी, काव्या चिटगी, ललिता वाली, मीनाक्षी बेटगेरी, लता काजगार, महादेवी कडकी, सरोजिनी दलवाई आदी उपस्थित होते.

 

 

Tags: