बेळगाव वकील संघटनेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

होय, बेळगाव वकील संघटनेच्या २०२१-२३ त्रैवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता मतदानास प्रारंभ झाला. रांगेत थांबून वकील मतदान करताना दिसून आले. अध्यक्ष, २ उपाध्यक्ष, सरचिटणीस, १ संयुक्त सचिव आणि ६ संचालक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण २०८९ वकील मतदार असून बहुतेकजण उत्साहाने मतदान केंद्रावर येऊन मतदान करताना दिसत होते. 
यावेळी माहिती देताना ऍड. आर. सी. पाटील म्हणाले, अत्यंत पारदर्शी पद्धतीने बेळगाव वकील संघ निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सुनील तुबची निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात आहेत. सकाळी १० वा. मतदान सुरु झाले असून ते सायंकाळी ५ वा. पर्यंत चालेल. त्यानंतर सायंकाळी ६ वा. नंतर मतमोजणीला प्रारंभ करण्यात येईल.
एकंदर बेळगाव वकील संघटनेची धुरा यावेळी कोणाच्या हाती जाणार याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.


Recent Comments