Belagavi

हिंडलगा प्राथमिक शाळेत बालदिन

Share

 कन्नडला विसरणे हे आईला विसरण्यासारखे आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून कन्नडचे रक्षण करण्याची गरज आहे असे विचार कन्नड जागृती समितीच्या अध्यक्षा सुनंदा एम्मी यांनी व्यक्त केले.

व्हॉईस ओव्हर : बेळगावातील हिंडलगा येथील कन्नड-मराठी प्राथमिक शाळेत लिंगायत महिला समाज, बेळगाव ग्रामीण गट शिक्षणाधिकारी कार्यालय, कन्नड जागृती समिती आणि कन्नड विकास प्राधिकरणाने घेतलेल्या कन्नड नाडनुडी गीत गायन, पुरस्कार वितरण आणि बालदिन समारंभ पार पडला. त्यावेळी बोलताना सुनंदा एम्मी पुढे म्हणाल्या, आपण जसे आईवर प्रेम करतो तसेच प्रेम कन्नड भाषेवर केले पाहिजे. आई समजून कन्नडचे रक्षण करूया असे त्यांनी सांगितले

यानंतर बालदिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांचे मान्यवरांच्याहस्ते ३० विध्यार्थ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी लिंगायत महिला समाजाच्या संस्थापिका व गौरवाध्यक्षा शैलजा भिंगे, अध्यक्षा शांता मसुती, सचिव संगीता अक्की, गौरव सदस्या रत्नप्रभा बेल्लद, साहित्यिक ज्योती बदामी, सुधा पाटील, जयशीला ब्याकोड, हेमा सोंनोळी, श्रीरंग जोशी, गट शिक्षण समन्वय अधिकारी एम. एस. मेदार, शिक्षक डी. जी. बेविनकोप्पमठ, विरेश करेरुद्रण्णावर, आर. सी. कंबाळीमठ आदी उपस्थित होते.

 

Tags: