Belagavi

हलगा – मच्छे बायपास विरोधात अर्धनग्न अवस्थेत निदर्शने

Share

हलगामच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीरपणे सुरु ठेवल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आज येळ्ळूर रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत निदर्शने केली.

होय, मूळ मार्ग बदलून, झिरो पॉईंट निश्चित न करता, सुपीक जमिनीचे अधिग्रहण करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हलगा – मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीरपणे करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याच्या निषेधार्थ शेतकरी गेल्या आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरूच ठेवले आहे. याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी शुक्रवारी येळ्ळूर रस्त्यालगत अर्धनग्न अवस्थेत निदर्शने केली.

यासंदर्भात बोलताना बेळगाव तालुका रयत संघटनेचे अध्यक्ष राजू मरवे म्हणाले, कायदा धाब्यावर बसवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हलगा – मच्छे बायपास रस्त्याचे काम बेकायदेशीरपणे करत आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हे काम करण्यात येत आहे. आजच केंद्र सरकारने सुधारित कृषी जमीन अधिग्रहण कायदा मागे घेतला आहे. त्याचप्रमाणे हलगा – मच्छे बायपास रस्त्यासाठी केलेले जमिनीचे संपादन रद्द करावे अशी मागणी राजू मरवे यांनी केली.

सोने पिकवणाऱ्या कसदार, सुपीक जमिनीतून बायपास रस्ता करण्याच्या सरकारच्या कृतीला शेतकऱ्यांतून तीव्र विरोध केला जात आहे. जसे केंद्राने सुधारित कृषी कायदे मागे घेतले त्या धर्तीवर बायपाससाठीच्या जमिनीचे अधिग्रहणही मागे घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

 

 

Tags: