Belagavi

कृषी कायदे मागे घेतले ही समाधानाची बाब : गोविंद कारजोळ

Share

 गुरु नानक जयंतीच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी सुधारणा कायदे मागे घेतले हे चांगले झाले अशी प्रतिक्रिया जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केली.

व्हॉईस ओव्हर : शुक्रवारी हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कृषी सुधारणा कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांनी चालविलेल्या आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले ही समाधानाची बाब आहे. जनतेनेही याचे स्वागत केले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आता आपापल्या घरी जाऊन पूर्ववत जीवन जगावे असे आवाहन कारजोळ यांनी केले.

 

Tags: