Khanapur

हत्तरवाडच्या तुळशी विवाहाला आ. निंबाळकरांची हजेरी !

Share

एक गाव एक तुळशी विवाहपरंपरा जपणाऱ्या खानापूर तालुक्यातील हत्तरवाड गावातील अनोख्या तुळशी विवाह सोहळ्याला खानापूरच्या . डॉ. अंजली निंबाळकर यांनी शुक्रवारी हजेरी लावली. यावेळी त्यांनी तुळशीची विशेष पूजाही केली.

खानापूर तालुक्यातील हत्तरवाड गावात गेल्या अनेक दशकांपासून ‘एक गाव एक गणपती’प्रमाणेच ‘एक गाव एक तुळशी विवाह’ परंपरा जपली जाते. संपूर्ण गाव मिळून आनंदाने कार्तिकी पौर्णिमेला तुळशीचा विवाह लावतो. रूढार्थाने होणाऱ्या विवाहाप्रमाणेच यावेळी लग्नसोहळ्याचे सर्व विधी पार पाडले जातात. खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनीही या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी लक्ष्मी देवीची व तुळशीची विशेष पूजा केली. ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी त्यांचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. यावेळी ग्रामस्थ महिलांसमवेत आ. निंबाळकर या भक्तिभावाने तुळशीपूजन करताना दिसून आल्या.

 

Tags: