Athani

प्रकाश हुक्केरी यांनी केली ‘पुनीत’ चाहत्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

Share

दिवंगत पुनीत राजकुमार यांचा सच्चा चाहता, अथणी येथील राहुल गाडीवड्डर याने पुनीत राजकुमार यांच्या निधनाची वार्ता ऐकून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. राहुल याच्या आत्महत्येनंतर अडचणीत आलेल्या कुटुंबाला माजी खासदार प्रकाश हुक्केरी आणि चिक्कोडी आमदार गणेश हुक्केरी यांनी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीने पंचवीस हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.

राहुल गाडीवड्डर याच्या कुटुंबियांना सदर मदत सुपूर्द केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश हुक्केरी म्हणाले, ग्राम पंचायत सदस्य उमेशगौडा पाटील यांनी राहुल गाडीवड्डर यांच्या निधनाबद्दल आपल्याला कळविले. त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याच्या उद्देशाने आमदार गणेश हुक्केरी यांनी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीने पंचवीस हजार रुपयांची मदत देऊ केली. तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असा भरवसा दिला. राहुल गाडीवड्डर यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्यास ईश्वर शक्ती देवो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी जुगुळ ग्रामपंचायत सदस्य अमीन नंदगावे, माजी आमदार राजू कागे यांचे आप्त सहाय्यक कुमार पाटील, गंगाधर हिरेमठ, पिंटू गाडीवड्डर, शंकर गाडीवड्डर आदी उपस्थित होते.

Tags: