वेळेवर आणि पुरेशा बस सोडण्याच्या मागणीसाठी चिक्कोडी तालुक्यातील करोशी येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून रास्ता रोको केला.

करोशी गावातील अनेक विध्यार्थी चिक्कोडी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यांना रोज सकाळी वेळेवर बस पकडून जावे लागते. मात्र गेल्या काही दिवसांपासून करोशीला बस वेळेवर येत नसून त्यांची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यास विलंब होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या संदर्भात वेळेवर बस सोडण्याची विनंती परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. मात्र तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी बस अडवून रास्ता रोको करत परिवहन मंडळाचा निषेध केला. विद्यार्थ्यांच्या रास्ता रोकोची माहिती मिळताच परिवहन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांची समस्या ऐकून घेतली. त्यानंतर यापुढे वेळेवर समर्पक बससेवा देण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको मागे घेतला.


Recent Comments