अवकाळी पाऊस आणि विपरीत हवामानाचा फटका बसल्याने विजापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार संकटात सापडले आहेत. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष पिकावर रोग पडल्याने त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

होय, लहरी हवामानामुळे विजापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार हैराण झाले आहेत. गुच्छासारखी भरघोस लगडलेली द्राक्षे हे विजापूर जिल्ह्याच्या द्राक्षांचे वैशिष्ट्य. मात्र खराब हवामानामुळे सध्या द्राक्षघोस फुटून जात आहेत. त्यामुळे द्राक्षांचे माहेरघर असलेल्या विजापूर जिल्ह्यातील हजारो द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. विजापूर जिल्ह्यात १६,६०० एकर क्षेत्रात द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. विजापूर, बबलेश्वर आणि तिकोटा तालुक्यातील हे एक प्रमुख पीक आहे.
मात्र गेल्या काही दिवसांपासून पसरलेले ढगाळ हवामान, नको तेंव्हा कोसळणारा पाऊस, दव आणि धुक्याचा भडीमार यामुळे डोणी रोगाचा प्रादुर्भाव द्राक्षावर होण्याच्या शक्यतेने उत्पादक चिंतेत आहेत. एकदा का या रोगाचा प्रादुर्भाव झाला की, तो नियंत्रणात अने कठीण असते. हजारो रुपये खर्च करूनही तो नियंत्रणात येण्याची शक्यता कमीच. त्यातच अवकाळी पावसाच्या पाण्याचे थेम्ब द्राक्ष घोसांमध्ये अडकून राहिल्यास द्राक्षावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही ठळक होते. याबाबत द्राक्ष उत्पादकांनी आपल्या व्यथा मांडल्या. बाईट
एकंदर लाखो रुपये खर्च करून द्राक्षांचे मळे फुलविलेल्या विजापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा डोणी रोगाचा मोठा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे.


Recent Comments