विधान परिषद निवडणूक लढविणार असलेल्या आपले बंधू लखन यांच्यासाठी माजी मंत्री व गोकाकचे आ. रमेश जारकीहोळी यांनी अथणी येथे नेत्यांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरु केला आहे.

होय, आ. रमेश जारकीहोळी यांनी गुरुवारी अथणी शहरातील काँग्रेस नेते हर्षद गद्याळ यांच्या घरो भेट देऊन सुमारे अर्धा तास गुप्त बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कागवाडात राजू कागे आणि अथणीत हर्षद गद्याळ यांची ते आजारी असल्याने भेट घेतली आहे. यात कसलाही राजकीय हेतू नाही. काँग्रेसकडून आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी विधान परिषद लढविणार असल्याने त्याचा फटका लखन याना बसेल का? या प्रश्नावर आ. रमेश जारकीहोळी म्हणाले, लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा. आमच्या पक्षातर्फे महांतेश कवटगीमठ निवडणूक लढवीत आहेत असे ते म्हणाले.
बंधू लहान निवडणूक लढविणार असल्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, राजकीयदृष्ट्या आम्हा भावा-भावांचे विचार स्वतंत्र आहेत. या संदर्भात भालचंद्र जारकीहोळी यांनी कोणत्या अर्थाने वक्तव्य केले हे ठाऊक नाही. आम्ही लखन यांच्यासाठी पक्षाकडे तिकीट मागितलेले नाही. मी तर महांतेश कवटगीमठ यांच्यासाठी प्रचार करत आहे. प्रत्येक तालुक्याला भेट देऊन प्रचार करत आहे असे त्यांनी सांगितले.
बिटकॉइनसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर आ. रमेश जारकीहोळी यांनी, देवाशपथ सांगतो, अजूनही मला यातले काहीच ठाऊक नाही असे सांगत काढता पाय घेतला.


Recent Comments