Belagavi

प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणुकीवर व्याख्यान

Share

बेळगावात अकॅडेमी ऑफ कंपॅरिटिव्ह फिलॉसॉफी अँड रिसर्च संस्थेच्या वतीनेप्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणुकीनुसार देवाची संकल्पनाया विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावातील हिंदवाडीतील गुरुदेव रानडे मंदिरात ‘प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणुकीनुसार देवाची संकल्पना’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी व्याख्याते म्हणून बेंगळूरच्या शांती प्रकाशनचे मोहम्मद कुन्ही उपस्थित होते. गदगच्या तोंटदार्य मठाचे तोंटद डॉ. सिद्दराम स्वामीजी प्रमुख अतिथी होते.

यावेळी प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विचारधारेसंदर्भात बोलताना मोहम्मद कुन्ही म्हणाले, ‘जग सुरळीत चालले आहे. येथे कोणत्या समस्या नाहीत. सृष्टिकर्त्याने निर्माण केलेल्या जगात समस्या असणारच नाहीत. सृष्टिकर्ता देव समर्थ आहे असे मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणुकीचे एकंदर सार आहे’ असे सांगितले.

यावेळी जमात-ए-इस्लामीं हिंदचे बेळगाव शाखेचे अध्यक्ष शाहिद मेमन यांनी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणुकीचा सारांश यावर उद्बोधक माहिती दिली.

यावेळी अकॅडेमी ऑफ कंपॅरिटिव्ह फिलॉसॉफी अँड रिसर्च संस्थेचे अध्यक्ष ऍड. अशोक पोतदार, गौरव सचिव ऍड. एम. बी. जिरली यांच्यासह इतर उपस्थित होते.

 

 

Tags: