Belagavi

२३ नोव्हेंबर रोजी चन्नराज हट्टीहोळी दाखल करणार उमेदवारी अर्ज

Share

२३ नोव्हेंबर रोजी चन्नराज हट्टीहोळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात असून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीत सतीश जारकीहोळी कुटुंबीय राजकारण करत असल्याच्या प्रश्नावर उतार देताना आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, सतीश जारकीहोळी हे आमच्या पक्षाचे भविष्य आहेत. आगामी काळात उच्च स्थानावर त्यांची वर्णी लागण्यासारखे नेतृत्व आहे. सतीश जारकीहोळी यांच्या कुटुंबियांचे राजकारण सुरु आहे, असे मला वाटत नाही, अशी प्रतिकेय आमदार हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.

कोणत्याही नेत्याची उमेदवारी हिसकावून घेण्यात आली नसून सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वानुमते उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, असेही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.

लखन जारकीहोळी यांच्या निवडणूक लढविण्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आम. हेब्बाळकर म्हणाल्या, निवडणूक लढविण्यासाठी ते स्वतंत्र आहेत. काँग्रेस उमेदवाराला कोणत्या प्रकारे विजयी करता येईल, याकडे लक्ष देऊन आपण काम केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

बेळगाव विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचाच विजय निश्चित असून विजयी झाल्यानंतर बेळगावमधील सर्व कार्यकर्ते, नेते मिळून पुन्हा संघाची पुनर्र्चना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०२३ च्या निवडणुकीत काँग्रेस अधिकाधिक जागांवर विजय प्राप्त करेल, असा विश्वास आम. हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.

सतीश जारकीहोळी कुटुंबाकडून कोणतेही राजकारण होत नसून आगामी निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी होईल, असा विश्वास ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केलाय.

Tags: