शामनूर शिवशंकराप्पांना मी वेडा वाटतो. वेडं कोण आहे हा एक इतिहास आहे. याला काळ उत्तर देईल अशा शब्दात शामनूर शिवशंकराप्पा यांना जागतिक लिंगायत महासभा प्रधान सचिव डॉ. एस. एम. जामदार यांनी टोला लगावला आहे.

बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. एस. एम. जामदार यांना स्वतंत्र लिंगायत धर्माच्या आंदोलनार्थ शामनूर शिवशंकराप्पा यांनी वेडा असे संबोधले होते. शामनूर शिवशंकराप्पा यांच्या या विधानाला काळ उत्तर देईल, अशा शब्दात जामदार यांनी सुनावले आहे.
या बैठकीत पुढे बोलताना डॉ. जामदार म्हणाले, लिंगायत धर्माला संविधानात्मक मान्यता मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. स्वतंत्र धर्म झाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. केंद्र सरकारने स्वतंत्र धर्म जाहीर करण्यासाठी काही अडचणी असल्याचे सांगितले असून वीरशिव हा लिंगायत समुदायातील एक छोटा संप्रदाय आहे असून सदर संप्रदाय बसवमताशी वेगळा असल्याचे ते म्हणाले, यासाठी स्वतंत्र लिंगायत समाजाची मागणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारकडे स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी एका पक्षाने प्रस्ताव मंडल होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या कुमारस्वामी, येडियुरप्पा यांच्या काळात सरकारला उत्तर देण्यात आले नाही. यामुळे स्वतंत्र धर्माचा विचार तीन पक्षामध्ये विभागाला गेला, याबद्दल जामदार यांनी असमाधान व्यक्त केले.
जागतिक लिंगायत महासभा केंद्र कार्यालय बेंगळूरमधून बेळगावमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर रोजी या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून यावेळी ११० मठाधीश, निवडणूक आलेले प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी जागतिक लिंगायत महासभेची तिसरी सर्वसाधारण बैठक बेळगावमध्ये आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला लिंगायत समाजाचे नेते शंकर गुडस, बसवराज रोट्टी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments