Khanapur

पेन्शनसाठी धडपडणाऱ्या असहाय वृद्धेला मदत

Share

खानापूर तालुक्यातील इटगी येथील एक असहाय वृद्ध महिला वृद्धापवेतनासाठी धडपडत होती. तिला अंजुमन इस्लामचे सचिव लियाकतअली बिच्चनावर यांनी मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले.

 होय, खानापूर तालुक्यातील इटगी येथील वृद्ध महिला चन्नम्मा बाळप्पण्णावर हिची पेन्शन एक वर्षांपासून बंद पडली आहे. त्यामुळे ती खानापूर तहसील कार्यालयात येऊन धडपडत होती. वयामुळे तिला धावपळ करणेही कठीण जात होते. त्यावेळी अंजुमन इस्लामचे सचिव लियाकतअली बिच्चनावर यांनी तिची विचारपूस केली. तिची माहिती घेऊन त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना भेटून वृद्धेला पेन्शन मिळवून देण्याबाबत व्यवस्था केली. तसेच तिच्यावर उपचार करवून नाश्ता देऊन बससाठी पैसे दिले. इतकेच नाही तर या वृद्धेला बसस्थानकावर सोडण्यासाठी रिक्षाची व्यवस्थाही करून दिली. लियाकत अली यांच्या या माणुसकीचे खानापुरात कौतुक होत आहे.

Tags: