Vijayapura

नळजोडणी होऊनही काम अर्धवट स्थितीत नागरिकांनी छेडले धरणे आंदोलन

Share

गेल्या १० वर्षांपासून विजापूर जिल्ह्यात दुष्काळ आहे. अशातच महानगर पालिका व्याप्तीत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. २४ तास पाणी पुरवठ्याचे आश्वासन देऊन नळजोडणी करण्यात आली आहे. या नळाला महिन्यातून एकदा जरी पाणी आले, तर ते आपले भाग्यच असेल! अशी उपहासात्मक टीका नागरिक करत आहेत. अमृत योजनेंतर्गत झालेल्या या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची टीका नागरिक करत आहेत.

एकीकडे अधिकाऱ्यांच्या विरोधात शाप देणाऱ्या महिलांचे दृश्य तर दुसऱ्या बाजूला पाणी नियामक मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या जनतेचे दृश्य…. विजापूर जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. सरकारने पिण्याच्या पाण्याच्या समस्येसाठी कोट्यवधींचा खर्च केला आहे. घराघरात नळजोडणी केली आहे. परंतु अद्यापही विजापूरमधील नागरिक पिण्याचे पाणी योग्यपद्धतीने मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. २००६ साली सुरु झालेले कामकाज अजूनही पूर्ण झाले नसून या पार्श्वभूमीवर काही जागरूक नागरिकांनी शहर पाणी नियामक मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे.

२००६ मध्ये अमृत योजनेंतर्गत नळजोडणी कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे. २००९ मध्ये सदर कामकाज पूर्ण होणे आवश्यक होते. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात लोकप्रतिनिधीही फोल ठरले आहेत. २००९ मध्ये कंत्राटदारांकडून दंड आकारून ऑक्टोबर २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सदर कामकाजाची मुदत संपूनदेखील अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी याकडे दुर्लक्ष केले असून सध्या नागरिकांनी याविरोधात आंदोलन छेडले आहे, अशी माहिती ऍडव्होकेट खाद्री यांनी दिली.

विजापूरमधील अमृत योजनेंतर्गत हाती घेतलेले नळजोडणी कामकाज अधिकारी आणि कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे अद्यापही अपूर्ण परिस्थितीत आहे. यासाठी स्थानिक नागरिकांनी याविरोधात आवाज उठविण्यासाठी आंदोलन छेडले असून सदर कामकाज लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे.

Tags: