Belagavi

इनरव्हील क्लबतर्फे तृतीयपंथीयांना मिनी कॅन्टीन गाडी

Share

तृतीयपंथीयांनाही जगण्याचा हक्क मिळावा, त्यासाठी त्यांचे सबलीकरण व्हावे या उदात्त हेतूने बेळगावातील ह्युमॅनिटी फौंडेशन आणि इनरव्हील क्लबच्या वतीने बुधवारी सकाळी बेळगावात तृतीयपंथीयांना मिनी कॅन्टीन गाडी वितरण करण्यात आले.  

होय, बेळगाव जिल्ह्यातील तृतीयपंथीयांचे सबलीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने ह्युमॅनिटी फौंडेशन आणि इनरव्हील क्लबच्या वतीने बुधवारी सकाळी बेळगावात तृतीयपंथीयांना मिनी कॅन्टीन गाडी वितरण करण्यात आले. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रत्ना बेहेरे यांनी फीत कापून या कार्यक्रमाचे उदघाटन केले. फ्लो

यानंतर बोलताना रत्ना बेहेरे म्हणाल्या, तृतीयपंथीयांना अंदाजात मान-सन्मान मिळावा, त्यांनाही स्वाभिमानाने जगता यावे या उद्देशाने क्लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

क्लबच्या अध्यक्षा सुषमा शेट्टी म्हणाल्या, तृतीयपंथीयांचे सबलीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने आमचा क्लब अनेक उपक्रम राबवत आहे. त्यांना कायद्यांचे ज्ञान दिले आहे. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी क्लबच्या सर्व सदस्यांतर्फे मिनी कॅन्टीन गाड्या देऊन आत्मनिर्भर करण्यात येत आहे.

याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी, सदस्य व तृतीयपंथी उपस्थित होते.

 

Tags: