hubali

हुबळीच्या रस्त्याची दयनीय अवस्था

Share

हुबळी शहरात दिवसेंदिवस समस्यांचा डोंगर वाढत चालला आहे. येथील रहदारीच्या समस्येसंदर्भात नागरिकांची दररोजची तक्रार झाली असून येथील रस्तेही आता व्हेंटिलेटरवर असल्याची अवस्था निर्माण झाली आहे. हुबळीमधील या रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर नेमका कोणता हा कोणता रस्ता आहे? याचे प्रश्नचिन्ह उभे राहिले नाही तरच नवल.. हुबळीमधील अशाच एका भयावह स्थितीत असलेल्या रस्त्यासंदर्भात जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमधून .

हुबळी शहरातील केशवापूरच्या सरस्वती पुरम कॉलनीमधील हि रस्त्याची अवस्था आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. या रस्त्याची चाळण ज्यापद्धतीने झाली आहे… त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनचालक तर धास्तावतातच परंतु पादचाऱ्यांनाही रस्त्याचा शोध घेऊन मार्गक्रमण करावे लागते. या रस्त्यावरून मार्गक्रमण करत असताना रस्त्यासोबतच शरीराचीही चाळण होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या रस्त्याच्या या दुरवस्थेकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे निदर्शनास येत आहे. दररोज शाळेला जाताना आपल्याला या रस्त्यामुळे होणाऱ्या अडचणींसंदर्भात एका विद्यार्थ्याने व्यक्त केलेली प्रतिक्रिया आपण पाहुयात .

हुबळीला वाणिज्यनागरी म्हणून ओळखले जाते. परंतु हे शहर आणि शहरातील रहदारी आणि रस्त्याच्या समस्या लक्षात घेता वाणिज्य नगर हे नाव केवळ नाममात्र असल्याचे बोलले जात आहे,. या रस्त्यावरून जाताना आपला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते,,येथील रस्त्यांची अशा पद्धतीची अवस्था पाहून रस्त्याची ओळख पटणेही मुश्किल झाले आहे, अशी प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

रस्त्याच्या या अशा अवस्थेसंदर्भात अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून देता, रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपल्याला माहिती नसल्याचे कारण अधिकारी देत आहेत. रस्त्याच्या अशा परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून इतक्या दुरवस्थेत रस्ता असूनही जर अधिकाऱ्यांना दिसत नसेल तर मग शहरातील बारीक सारीक समस्यांबाबत तर न बोललेलेच बरे. हुबळी शहर हे नावाप्रमाणे वाणिज्य शहर म्हणून कधी नावारूपाला येणार ? याची प्रतीक्षा नागरिक आवासून करत आहेत.

Tags: