award

प्रगतशील शेतकरी शिवगौड पाटील यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

Share

चिकोडी तालुक्यातील पोगत्यानहट्टी या गावातील प्रगतशील शेतकरी शिवगौड पाटील यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. रोपांची काळजी आणि पालन पोषण संदर्भातील पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

व्हॉइस : केंद्र सरकारच्या वनस्पती संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाकडून दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदालाजे तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते रोपांचे संगोपन आणि संगोपनात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या चिकोडी तालुक्यातील शिवगौड पाटील यांना रुपये १ लाख रोख आणि प्रशस्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. (फ्लो)

शिवनगौड पाटील यांनी आपल्या ६ एकर शेती आवारात ७२ जातींचे केळीची बागायत, १२ प्रकारच्या आंब्यांची बागायत, ४ प्रकारची फणसझाडे, ९२ विविध औषधी झाडे, सुपारी, काळीमिरी, चेरी, प्लम, सफरचंद यासह देश – विदेशातील नवनव्या रोपांची लागवड करून चिकोडी भागात विशेष प्रकारची शेती केली आहे. शेती विषयक या नव्या प्रयोगाची दखल घेऊन केंद्र सरकारतर्फे त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यासंदर्भात इन न्यूज ला प्रतिक्रिया देताना शेतकरी शिवनगौड पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये नवनवे प्रयोग आपण करीत आहोत. विदेशातील पिके आपल्या शेतात कशा पद्धतीने घेता येतील, याचा अभ्यास करून शेतामध्ये प्रयोग केला असून शेतातील या पिकांचे पालन पोषण मी करत आहे. माझ्या या प्रयोगाची दखल केंद्र सरकारने घेतली असून माझ्या शेतीविषयक कामासंदर्भात मला पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे माझ्यात पुन्हा नवचेतना निर्माण झाली असून पुढील प्रयोगासाठी माझ्यासाठी हि शक्ती बनली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. (बाईट)

शेती विषयक या नव्या प्रयोगाची दखल घेऊन केंद्र सरकारतर्फे त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून केंद्र सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

Tags: