Chikkodi

बिटकॉइन प्रकरणात काँग्रेसकडून दिवाळखोरीचे दर्शन : आ. पी. राजीव

Share

बिटकॉइन प्रकरणात काँग्रेसने आपले बौद्धिक, नैतिक दिवाळे निघाले असल्याची टीका कुडचीचे . पी. राजीव यांनी केली

चिक्कोडीत मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना आ. पी. राजीव म्हणाले, राष्ट्रीय पक्ष म्हणजे त्याच्या नेत्यांना सगळे ज्ञान हवे. बिटकॉइन हे गुन्हेगारी प्रकरण आहे. प्रकरण आणि घोटाळा यातील फरक काँग्रेसला माहित नाही. सत्तेवर असताना काँग्रेसने हे प्रकरण उघडकीला आणायला पाहिजे होते. तेंव्हा मूग गिळून गप्प बसलेल्या काँग्रेसने राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे असा आरोप आ. राजीव यांनी केला.

भाजपने २०२०मध्ये सरकार सत्तेवर येताच सुओ मोटो केस दाखल केली. इंटरपोल, अमलबजावणी संचालनायाला माहिती दिली. काँग्रेसने जे केले नाही ते भाजपने करून दाखवले. ही भाजप सरकारची वचनबद्धता आहे. सिद्दरामय्या याना बोलायला आता दुसरा विषय नाही. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची कार्यक्षमता पाहून ते निराश झाले आहेत. बिटकॉइन प्रकरणी काँग्रेस अपयशी ठरली आहे. लोकांचे लक्ष अन्यत्र वळवून पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न ते दिवस पहात आहेत अशी टीका आ. राजीव यांनी केली.

बिटकॉइन प्रकरणाचा तपास मुळापासून केला तर त्यात काँग्रेस आमदारांच्या पुत्रांचा सहभाग स्पष्ट होईल असेही भाजप आ. पी. राजीव यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

Tags: