Belagavi

बेळगाव जिल्हाधिकारीपदी आर. व्यंकटेशकुमार रुजू

Share

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांची सरकारने बदली केली असून, त्यांच्याजागी आर. व्यंकटेशकुमार यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या १० डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवडणूक काळात स्वतःच्या जिल्ह्यात सेवा बजावत येत नाही. जिल्हाधिकारी हिरेमठ हे बेळगाव जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कलबुर्गी येथील कल्याण कर्नाटक प्रदेश विकास मंडळाचे सचिव आर. व्यंकटेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर. व्यंकटेशकुमार यांनी मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी त्यांनी विधान परिषद निवडणुकीची पूर्वतयारी आणि अर्ज दाखल-माघार आदी प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, बैलहोंगलचे प्रांताधिकारी शशिधर बगली व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Tags: