Belagavi

बायपास : कंत्राटदाराला शेतकऱ्यांनी घेतले फैलावर

Share

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रशासनाने शेतकऱ्यांचा विरोध डावलून हलगामच्छे बायपास रस्त्याचे काम सुरूच ठेवले आहे. मंगळवारी सकाळीही शेतकऱ्यांनी काम सुरु करण्यास आलेल्या कंत्राटदाराला चांगलेच फैलावर घेतले.

वर्षाला चार पिके येणाऱ्या सुपीक जमिनीतून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन नुकतेच केले होते. तरीही महामार्ग प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्तात काम सुरु केले. यावेळी पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. सध्या कार्यस्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून पोलीस संरक्षणात काम सुरूच ठेवण्यात आले आहे.

त्याला शेतकरी कार्यस्थळालगतच बसून विरोध करत आहेत. मंगळवारी सकाळी काम सुरु करण्यास आलेल्या कंत्राटदाराला शेतकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले. हलग्याजवळून महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बायपासचे काम सुरु केले आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात जमून विरोध करतील या भीतीने कार्यस्थळी पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. तरीही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना काम बंद करा अशी मागणी करून वर्क ऑर्डर दाखवा असा हट्ट धरला.

 

Tags: