Belagavi

एपीएमसी रोडवर उसवाहू ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने वाहतूक कोंडी

Share

बेळगावातील एपीएमसी रोडवर उसवाहू ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने वाहतूक कोंडी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सुदैवानेच या घटनेत प्राणहानी झाली नाही.

बेळगावातील आझमनगरजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. सकाळी ९.३०च्या सुमारास ही घटना घडली. आझम नगर-एपीएमसीला जोडणाऱ्या या रस्त्यावर नेहमी खास करून सकाळच्या वेळी मोठी वर्दळ असते. सकाळीच ही घटना घडल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण झाली. बराच काळ येथे वाहतूक कोंडी झाली होती.

Tags: