Kagawad

कागवाड तालुक्यातील ऐनापूर परिसरात माकडाचा उच्छाद : उच्छाद मांडणाऱ्या माकडाची जंगलात रवानगी

Share

कागवाड तालुक्यातील ऐनापूर परिसरात माकडाने उच्छाद मांडला होता. परिसरात वावरणाऱ्या या माकडाने प्रत्येकावर हल्ला करण्याचा सपाटा लावला होता. दरम्यान या माकडाची रवानगी जंगलात करण्यात आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

कागवाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात माकडांनी उच्छाद मांडला आहे. अशातच ऐनापूर परिसरात पिसाळलेल्या माकडाने उच्छाद मांडला होता. या माकडाच्या उपद्व्यापामुळे नागरिक हैराण झाले होते. शाळकरी मुलांच्या हातातील साहित्य हिसकावणे, दूध विक्रेते, भाजी विक्रेते या साऱ्यांचीच हे माकड डोकेदुखी ठरले होते. शाळांना नुकतीच सुरुवात झाली असून सकाळच्या वेळेत आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिलावर्गालाही या माकडामुळे मनस्ताप झाला होता.

हि बाब लक्षात घेऊन परिसरातील नेते अरुण गाणींगेर, कुमार अपराज, आदिनाथ दाणोळ्ळी , संजय भिरडी, बाहुबली कुसनाळे, मल्लप्पा गाणीगेर, तात्यासाब कुचनुरे, राजू खवटकोप्प, संतोष गुंडाळे यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अनिलकुमार यांच्याशी संपर्क साधला. माकडासंदर्भात अरण्य अधिकाऱ्यांच्या लक्षात हि बाब आणून देऊन सदर माकडाला जंगलात सोडण्याची विनंती करण्यात आली. अरण्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माकडाला पकडून जंगलात सोडले आणि त्यानंतर साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

Tags: