सध्या स्पर्धात्मक युगाची चलती आहे. या युगात आपला टिकाव आणि निभाव लागायचा असेल आणि आपले ध्येय गाठायचे असेल योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून हल्ली अनेक विद्यार्थी आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत असून याच उद्देशाने विजापूरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

विजापूर मधील कंदगल हनुमंतराय रंगमंदिरात समाज कल्याण विभाग आणि दलित विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसंदर्भात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत एसपी आनंदकुमार, सीईओ गोविंद रेड्डी यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एसपी आनंदकुमार म्हणाले, आपले आयुष्य किती आहे हे कुणालाही माहीत नाही. प्रत्येकाला दिवसातील 24 तास मिळतात. या 24 तासांमधील किती वेळ आपण योग्य गोष्टीसाठी खर्च करायचा आणि आपले ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने कोणत्या पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर जिल्हा पंचायत सीईओ गोविंद रेड्डी यांनी स्पर्धात्मक परीक्षांना कसे सामोरे जायचे? आयएएस, आयपीएस, सरकारी नोकरी, राज्य सरकारचे आरक्षण यासंदर्भातील विस्तृत माहिती दिली.
यानंतर ऍडव्होकेट श्रीनाथ पुजारी यांनी स्पर्धात्मक परिक्षांसंदर्भात बोलताना सांगितले की, आशा पद्धतीच्या परीक्षांसाठी प्रदीर्घ अभ्यासाची गरज आहे. या स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


Recent Comments