शहापूर परिसरात रात्रीच्यावेळी कारवर दगडफेक करून कारच्या काचा फोडून दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला बेड्या ठोकण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे.

होय, शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री शहापूरातील सराफ गल्ली आणि कचेरी गल्लीत रस्त्यावर पार्क केलेल्या ४ कारवर दगडफेक करून नुकसान केल्याची घटना घडली होती. यात कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील रहिवाशांत भीतीचे वातावरण पसरले होते. दगडफेक करून दहशत माजविणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली होती. तक्रार नोंदवून घेऊन शहापूर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या चित्रणाच्या आधारे दगडफेक करणाऱ्या युवकाला अटक केली आहे. या युवकाची चौकशी करण्यात येत आहे.


Recent Comments