घरात झोपण्याच्या जागेच्या किरकोळ कारणावरून काका आणि पुतण्यात झालेल्या भांडणाचे पर्यवसान पुतण्याच्या खुनात झाल्याची दुर्दैवी घटना बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी गावात घडली आहे.

होय, मध्यपानाच्या दुष्परिणामांबाबत डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आहे. बैलहोंगल तालुक्यातील बेळवडी गावातील ३५ वर्षीय युवक यशवंत बंडीवड्डर असे या घटनेत मरण पावल्याचे नाव आहे. गेल्या ९ नोव्हेंबरला यशवंत आणि त्याचा काका ४७ वर्षीय हणमंत बंडीवड्डर यांच्यात दारूच्या नशेत झोपण्याच्या जागेवरून कडाक्याचं भांडण झालं होत. त्यावेळी दोघांच्या तुंबळ हाणामारीही झाली. यात यशवंत जखमी झाल्याने त्याला हुबळीतील किम्स इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल असे सांगितल्याने यशवंतने डॉक्टरांशीही भांडण काढले. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला घरी पाठविले. इस्पितळामध्ये घेतलेल्या उपचारांचा उपयोग न होता यशवंतचा मृत्यू झाला. या संदर्भात दोडवाड पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे असे लक्ष्मण नामक ग्रामस्थाने सांगितले.
काही झाले तरी दारूचे व्यसन वाईटच ! दारूच्या नशेमुळेच अगदी क्षुल्लक कारणावरून झालेल्ये भांडणात यशवंतचा मृत्यू झाला तर काकाला गजाआड व्हावे लागले. त्यामुळे बंडीवड्डर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे मात्र खरे.


Recent Comments