Chikkodi

तुक्कानट्टी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त विशेष ‘ट्रीट’

Share

सध्या अक्षर दासोह कार्यक्रमांतर्गत बहुतांशी शाळांमधून विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविला जातो. मात्र चिकोडी येथील कन्नड प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून, बालदिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांसाठी खास पक्वांनाची मेजवानी दिली. विविध प्रकारच्या पदार्थांची चव घेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात बालदिन साजरा केला.

चिकोडी भागातील तुक्कानट्टी कन्नड प्राथमिक शाळेत बालदिनाच्या निमित्ताने सुमारे ८०० विद्यार्थ्यांसाठी खास पक्वान्नाची मेजवानी शाळेचे मुख्याध्यापक ए. व्ही. गिरेन्नावर यांनी बालदिनाच्या निमित्ताने भेटीदाखल दिली. बदाम पुरी, जिरा राईस, मसाला सांबार, पकोडा, विविध प्रकारच्या रोटी, विविध प्रकारच्या चटण्या अशा अनेक पदार्थांनी भरली मेजवानी विद्यार्थ्यांनी बालदिनाच्या औचित्याने चाखली. (फ्लो)

दररोज या शाळेत अक्षर दासोह उपक्रमांतर्गत माध्यान्ह आहार देण्यात येतो. परंतु बालदिनाच्या निमित्ताने मुडलगी येथील विभागीय शिक्षणाधिकारी अजित मन्निकेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक ए. व्ही. गिरेन्नावर यांनी खास मेजवानीचे नियोजन केले. मुख्याध्यापकांनी केलेल्या या विशेष मेजवानीचे आणि उपक्रमाचे मन्निकेरी यांनी कौतुक केले.

बालदिनाच्या औचित्याने गावरान संस्कृतीचे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांसाठी देण्याचा मानस होता. बालदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्तेच करण्यात आले. गोकाक मुडलगी विभागाचे अक्षरदासोह संचालक अशोक मलबन्नवर यांनीही शाळेच्या मुख्याध्यापकांचे कौतुक केले. मुख्याध्यापकांनी स्वखर्चातून आयोजित केलेल्या हा उपक्रम राज्यातील इतर शाळांसाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले.

या विशेष उपक्रमासंदर्भात बोलताना शाळेचे मुख्याध्यापक ए. व्ही. गिरेन्नावर म्हणाले, शाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पटसंख्या वाढण्यासाठी तसेच सरकार शाळेतील मुलांसाठी सरकारद्वारे निधीही देण्यात येतो. विद्यार्थ्यांसाठी असलेला निधी विद्यार्थ्यांसाठीच खर्च करून माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना या विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

यावेळी कल्लोळी सीआरपी गणपती उप्पर यांच्यासह शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Tags: