दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावातील कपिलेश्वर मंदिरात सोमवारी कार्तिक एकादशीनिमित्त कपिलेश्वराला रुद्राभिषेक घालून विशेष पूजा करण्यात आली.

कार्तिक एकादशीनिमित्त बेळगावातील कपिलेश्वर मंदिरात सोमवारी विविध धार्मिक विधींसह कपिलेश्वराला रुद्राभिषेक घालून विशेष पूजा करण्यात आली. यावेळी कपिलेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, राजू पाटील, गणेश पाटील, गणेश देवर, बसनगौडा पाटील आदी उपस्थित होते. दिवसभरात असंख्य भक्तांनी मंदिरात कपिलेश्वराचे दर्शन घेतले.


Recent Comments