कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी खानापुर तालुक्यात गांधी जयंतीपासून सुरु केलेल्या कायदा जागृती अभियानाचा सोमवारी विध्यार्थ्यांच्या सायकल फेरीने समारोप करण्यात आला.

कायदा जागृती अभियानाच्या समारोपानिमित्त काढलेल्या विध्यार्थ्यांच्या सायकल फेरीचे उदघाटन ज्येष्ठ मुख्य दिवाणी न्या. पी. मुरलीमोहन रेड्डी, अतिरिक्त मुख्य न्या. एस. सूर्यनारायण राव, खानापूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष ईश्वर घाडी, गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण यक्कुण्डी आदी मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. मराठा मंडळ आणि ताराराणी हायस्कुलच्या विध्यार्थ्यानी सायकल फेरीत भाग घेतला. बेळगाव-गोवा महामार्गापासून सुरु झालेली ही फेरी शिवस्मारक चौक, स्टेशन रोड, चिरमुरकर गल्ली, बाजारपेठ आदी प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. 
यावेळी बोलताना ज्येष्ठ मुख्य दिवाणी न्या. पी. मुरलीमोहन रेड्डी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे खानापुर तालुक्यात कायदा साक्षरता व जागृती शिबिरे घेण्यात आली आहेत. तालुक्यातील २२१ गावांमध्ये वकिलांच्या माध्यमातून ग्रामस्थांना कायद्याचे महत्व व कायदेशीर मदतीबाबत जागृती कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. यासाठी ४० हुन अधिक खात्यांच्या विविध सरकारी खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे असे न्या. रेड्डी यांनी सांगितले.
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ईश्वर घाडी म्हणाले, न्याय व्यवस्था अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरिबांना न्याय मिळवणे सोपे होईल. त्यामुळे न्यायालयांवरील खटल्यांचे ओझेही कमी होण्यास मदत होणार आहे. कायदा जागरीतु उपक्रमांतर्गत ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम, बालविवाह प्रतिबंध, लिंग समानता, मतदानाचा हक्क, पर्यावरण रक्षण आदींबाबत माहिती देऊन जागृती करण्यात आली आहे. बाईट
यावेळी खानापुरातील वकील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. – अल्ताफ बसरीकट्टी, आपली मराठी, खानापूर


Recent Comments