पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी कार्यकर्त्यांना ‘पोषण अभियान‘ असा मजकूर छापलेल्या साड्या देण्यात येत आहेत. त्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाला धक्का बसत असल्याचा आरोप करून अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सिटूच्या नेतृत्वाखाली बेळगावात निदर्शने केली.

बेळगावातील शिवाजी नगरातील महिला आणि बालकल्याण खात्याच्या उपसंचालक कार्यालयासमोर अंगणवाडी कार्यकर्त्यांनी सोमवारी निदर्शने केली. प्रिंटेड मजकूर असलेल्या साड्या परत घेण्याची मागणी करत अंगणवाडी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना ‘सिटू’ आणि अंगणवाडी कार्यकर्त्या संघटनेच्या तालुका अध्यक्षा मंदा नेवगी यांनी, ‘पोषण अभियान’ असा मजकूर छापलेल्या साड्या देऊन सरकार प्रसिद्धी मिळवत आहे. परंतु यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाला धक्का बसत असल्याचा आरोप केला. सरकारच्या या धोरणाला अंगणवाडी कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
निदर्शनात सुनीता ठोंबरे, एस. एस. ठोंबरे, मीरा मोरे, महादेवी परीट, रुक्मिणी पाटील, शैलजा कुलकर्णी, गीता उदघटगी, वंदना चव्हाण, कमल मेळ्ळी आदींनी भाग घेतला.


Recent Comments