कन्नडच्या रक्षणासाठी बेळगावातील कन्नडपर आंदोलक करत असलेले कार्य संपूर्ण कर्नाटकाला आदर्श आहे असे विचार हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
हुक्केरी हिरेमठात रविवारी ४८वा मासिक सुविचार चिंतन आणि कन्नड आंदोलकांचा सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी बोलताना चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी कन्नड भाषेचा वापर व्यापक पातळीवर व्हावा, त्यामुळेच कर्नाटकाचा सर्वागीण विकास होईल. नव्या पिढीतील कन्नडसाठी लढू शकणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे आवाहन केले. 
यावेळी कित्तूरच्या कलमठाचे मडिवाळ राजयोगेंद्र महास्वामी म्हणाले, कित्तूर संस्थानाने कन्नडच्या रक्षणासाठी आधीपासूनच काम केले आहे. त्यामुळेच आज मुंबई-कर्नाटक प्रांताचे नामकरण कित्तूर-कर्नाटक असे झाले आहे.
यावेळी ‘बजरंगी-२’ चित्रपटातील कलाकार वज्रगिरी यांचा शाल घालून सत्कार करण्यात आला. यावेळी कन्नड आंदोलक अशोक चंदरगी, रमेश सोनटक्की, महादेव तळवार, दीपक गुडगनटी, मैनुद्दीन मकानदार, शिवाप्पा शमरांत, महांतेश रनगट्टीमठ आदी उपस्थित होते.


Recent Comments