शहापूर भाजीमार्केट्मध्ये रस्त्यावर पडलेल्या काविळीच्या असहाय्य रुग्णाला उपचारांसाठी जिल्हा इस्पितळात दाखल करून वीर मदकरी गर्जना संघाच्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

होय, बेळगावातील शहापूरातील दाणे गल्ली भाजीमार्केट्मध्ये काविळीची लागण झालेला एक अज्ञात रुग्ण रस्त्यावर पडला होता. त्याच्या मदतीला कोणी जात नव्हते. याची माहिती मिळाल्यावर वीर मदकरी गर्जना संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याला रुग्णवाहिका मागवून बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचारांसाठी दाखल करून माणुसकीचे दर्शन घडवले. त्या रुग्णावर सध्या जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.


Recent Comments