Khanapur

न्यायाधीशांनी दिली दुर्गम गावांना भेट; जाणून घेतल्या समस्या

Share

घनदाट जंगलात मूलभूत सुविधांचा अभाव आणि त्या पुरविण्याकडे सरकारचे दुर्लक्ष अशा दुष्टचक्रात अडकलेल्या पश्चिम घाटातील नागरिकांची ससेहोलपट सुरु आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द खानापूरच्या न्यायाधीशांनीच या भागाला भेट देऊन नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली.

खानापूरचे अतिरिक्त न्या. एस. सूर्यनारायण यांनी खानापूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांच्यासमवेत भीमगड अभयारण्य परिसरातील गवळीवाडा आणि पास्तोली गावांना भेट देऊन येथील रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या. अतिदुर्गम भागात वसलेल्या या खेड्यांतील रस्ते, पूल व अन्य मूलभूत सुविधांचा अभाव, मोबाईल नेटवर्कचा अभाव आदी समस्या त्यांनी जाणून घेतल्या.

या संदर्भात माहिती देताना ऍड. ईश्वर घाडी म्हणाले, ३ लाखांहून कमी उत्पन्न असलेले नागरिक न्यायापासून वंचित राहू नयेत यासाठी कायदा सेवा प्राधिकरणातर्फे मोफत वकील, कायदसेवा पुरविण्यात येत आहे. त्यामुळेच ‘कायदा लोकांच्या दारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा लोकांनी सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.

 

Tags: