विजापूर जिल्ह्यात भूकंपाच्या घटना सुरूच असून नागरिक मात्र घाबरून जात आहेत. आज, रविवारी सकाळी मनगुळी येथे भूकंपाचे धक्के जाणवले.

होय, विजापूर जिल्ह्याच्या मागे लागलेले भूकंपाचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे काही दिसेनात. रविवारी सकाळी ६.२० च्या सुमारास मनगुळी येथे जमिनीखालून जोरदार आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवले. विजापूर शहराच्या आसपासही सकाळी ६.२० च्या सुमारास गडगडाटी आवाजासह भूकंपाचे जोरदार धक्के बसले. त्यामुळे लोक भयभीत होऊन घराबाहेर पडले. जिल्हा प्रशासनाने भूकंपाबाबत सत्य माहिती जाहीर करून लोकांमधील संभ्रम दूर करावा अशी मागणी मनगुळी ग्रामस्थांनी केली आहे.
कमी क्षमतेचे भूकंप होण्याच्या घटना विजापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वरचेवर घडत आहेत. त्यामुळे जिल्हावासियांत संभ्रम आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सरकार आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देऊन जनतेच्या मनातील भीती दूर करण्याची गरज आहे.


Recent Comments