संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विध्यमाने बेळगावात रविवारी जागतिक मधुमेह दिन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
बेळगावातील कॅम्पमधील डेव्हिड्सन रस्त्यावरील संत निरंकारी सत्संग भवनमध्ये रविवारी रविवारी जागतिक मधुमेह दिन आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोककुमार मनचंदजी उपस्थित होते. गौरव अतिथी म्हणून डॉ. माने आणि रेडक्रॉस सोसायटीचे जिल्हा प्रमुख अशोक बदामी उपस्थित होते. खा. मंगल अंगडी यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मान्यवरांनी रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून, कोरोना काळात याचा सर्वाना अनुभव आला आहे. रक्तदान केल्याने शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. उलड शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते. रक्तदानामुळे इतरांचा जीव वाचविण्यास मदत होते. त्यामुळे स्वयंप्रेरणेने सर्वानी रक्तदान करण्यास पुढे यावे असे आवाहन केले. 
शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. ‘निरंकारी’चे डॉ. पवनकुमार शर्मा यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुशीलकुमार बात्रा, शशी आनंद, डॉ. डी. एन. मिसाळे यांच्यासह संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments