Accident

कोण्णूर येथे उसवाहू ट्रॅक्टर उलटला; वाहतूक कोंडीने अनेकांना मनस्ताप

Share

उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याची घटना गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथे घडली. भर रस्त्यात ट्रॅक्टर उलटल्यामुळे याठिकाणी बराच वेळ वाहतूक कोंडी झाली.

होय, आज सकाळपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे कोण्णूर-सावळगी रेल्वे पुलाजवळ उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची चाके घसरून उसवाहू ट्रॅक्टर रस्त्यात उलटला. सुदैवाने या अपघातात जिव्हानी झाली नाही. परंतु रस्त्याच्या मध्येच ट्रॅक्टर उलटल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. गोकाक आणि बेळगावकडे जाणाऱ्या लोकांची गैरसोय झाली. 

अपघातानंतर शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने उलटलेला ट्रॅक्टर सरळ केला. मात्र यात बराच वेळ गेल्याने अनेक वाहनचालकांना मनस्ताप झाला. अनेकांनी वाहने मागे फिरवून आपले गाव गाठले.

 

Tags: