अथणी मोटगीमठाचे प्रभू चन्नबसव महास्वामी लिखित महात्मा चरितामृत या २००० पाणी ग्रंथाचे प्रकाशन मंगसुळी ग्रामदेवता श्री मल्लय्या देवाच्या पुण्यभूमीत माजी आमदार के. पी. मगेन्नवर आणि केपीसीसी सदस्य दिग्विजय पवार देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

अथणी मोटगीमठाचे प्रभू चन्नबसव महास्वामी यांनी महात्मा चरितामृत या ग्रंथसंदर्भात माहिती दिली. या ग्रंथामध्ये सर्व धर्मांसंबंधी विशेष अभ्यास करून माहिती देण्यात आली आहे. बुद्ध, बसव, महावीर यांच्यासह अनेक महात्म्यांच्या संदर्भात माहिती समाविष्ट करण्यात आली असून सदर ग्रंथ प्रत्येकाच्या घरात, संस्थेमध्ये असायलाच हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यानंतर बोलताना स्वामीजी म्हणाले, पुनीत राजकुमार यांना त्यांच्या निधनापूर्वी दहा दिवस मी हा ग्रंथ दिला होता. अत्यंत आदराने त्यांनी हा ग्रंथ आपल्या डोक्यावर घेऊन नमस्कार केला. प्रत्येकाच्या घरात हा ग्रंथ असायलाच हवा असे मत त्यांनी व्यक्त केले होते. अशा शब्दात त्यांनी पुनीत राजकुमार र्यांच्यासंदर्भातील आठवणीला उजाळा दिला.
यावेळी केपीसीसी सदस्य दिग्विजयसिंग पवार देसाई, रवींद्र पुजारी, आदिनाथ दाणोळ्ळी , सागर मंगसुळे, प्रदीप मगेंणावर, शीतल मगेंनावर, जिन्नाप्पा शेडबाळे, उपाध्यक्ष अशोक चिमायी, संजय शेट्टी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments