Vijayapura

विजापुरात कडाक्याची थंडी आणि पावसाची रिपरिप !

Share

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम एरव्ही उष्ण तापमान असणाऱ्या विजापूर जिल्ह्यावर जाणवू लागला आहे. गेले दिवस कडाक्याची थंडी आणि पावसाची रिपरिप असे दृश्य दिसून येत आहे.

होय, विजापुरात आज सकाळपासूनच मोडाचे वातावरण पसरून पावसाची रिपरिप सुरु झाली. त्यासोबतच कडाक्याची थंडी जाणवू लागल्याने लोक रेनकोट, छत्र्या, उबदार कपडे, स्वेटर्स, जाकीट, कानटोप्या घालून बाहेर पडताना दिसत होते. गेल्या २ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु असून शहरावर दात धुक्याची चादर पसरली आहे. पावसासोबतच वातावरणार गारठा पसरला आहे. त्यामुळे पहाटे फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून आले. दरम्यान, अनेकांनी गुलाबी थंडीत फिरून गरमागरम भजी, चहा-कॉफीचा आस्वाद घेतला. ग्रामीण भागात मात्र हा पाऊस आणि कडाक्याची थंडी शेतकऱ्यांना शाप ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण त्याचा अनिष्ट परिणाम द्राक्ष पिकावर होणार असल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 

Tags: