Bailahongala

मृत्यूनंतरही युवक झाला अमर ! बैलहोंगलच्या युवकाचे नेत्र-त्वचादान

Share

अकाली मरण पावलेल्या युवकाने नेत्र आणि त्वचादान करून खऱ्या अर्थाने अमरत्व प्राप्त केले आहे.

होय, बैलहोंगल शहरातील हरळय्या कॉलनीतील रहिवाशी २८ वर्षीय युवक आकाश तिप्पण्णा सवदत्ती याचे शनिवारी सकाळी निधन झाले. मुलाच्या अकाली मृत्यूचे दुःख असतानाही आकाशच्या कुटुंबीयांनी त्याचे नेत्र आणि त्वचा दान केली. त्यामुळे नेत्रहिनांना आणि त्वचा भाजलेल्या रुग्णांना नवजीवन प्राप्त होऊन दिलासा मिळणार आहे. आकाशच्या मागे आई-वडिलांसह मोठा परिवार आहे. आज दुपारी बैलहोंगल येथील बेळगाव रस्त्यावरील प्रशांती मुक्तिधाम त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

 

Tags: